पाऊस…… प्रत्येकाचा वेगळा

tumblr_inline_nopi5oyCa51srob4n_500

रिमझिम धारा पडू लागता निसर्ग फुलतो सगळा
वय, काळ अन परिस्थितीने ठरतो पाउस वेग
ळा
कुणासाठी हा पाउस करतो आनंदाची दाटी
तर कुणा वाटते त्याच्यापरी नभ रडते धरतिसाठी
 
बालपणीच्या काळी जमते पावसाशी गट्टी
शाळेभोवती तळे साचुनी मिळे कधी सुट्टी
डबक्यातील पाण्यात धावती किती कागदी होड्या
भिजुन आला ताप तरीही थांबत नाहीत खोड्या  
 
तारुण्याचा रुतु फुलाविती अवखळ श्रावणधारा
गंध घेउनी प्रेमाचा बेभान वाहतो वारा
खिड़कीतुन थेंबाना झेलत गप्पा रंगती रात्री
अर्धं भिजले तरीही दोघांत एकच असते छत्री
 
संसाराच्या वळणावरती नसतो पाउस खास
कधी train late कधी traffic jam ने उगाच होतो त्रास
अंदाज़ वाचताना पावसाचे सोबत असतो चहा
असला नसला पाउस तरीही office ९ ते ६
 
आयुष्याच्या संध्याकाळी होता आभाळ काळे
मनात दाटून येती किती स्मृतींचे पावसाळे
भिजू वाटता तब्येतीचे कारण येते आड़
ऊन पावसा झेलुन झुकले अनुभवांचे झाड
 
काळ असो कुठलाही पाउस देतो ओली आठवण
चिंब होउनी थेंबांसंगे टिपून घ्यावा क्षण क्षण
फुलण्याचा अन मोहरण्याचा मंत्र देई बरसात
मळभ झटकुनी दुःखाचे होऊ दे नवी सुरुवात
Advertisements